सांगलीत काँग्रेसला धक्का, कवठेमहांकाळमधील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 02:58 PM2023-04-22T14:58:49+5:302023-04-22T15:00:13+5:30

बाजार समितीच्या निवडणुकीबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष

Shock to Congress in Sangli, excitement over the resignation of office bearers from Kavthe Mahankal | सांगलीत काँग्रेसला धक्का, कवठेमहांकाळमधील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

सांगलीत काँग्रेसला धक्का, कवठेमहांकाळमधील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

googlenewsNext

महेश देसाई

शिरढोण : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला बैठकीला बोलवले नाही. जागा वाटपाची प्रक्रिया सांगितली नाही, कवठेमहांकाळ काँग्रेसला एकही जागा दिली नाही, त्यामुळे तालुकाध्यक्ष संजय हजारे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सामूहिक राजीनामे दिले.  

तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने बाजार समितीच्या निवडणुकीबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिल्याने तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील व जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी तालुका समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Shock to Congress in Sangli, excitement over the resignation of office bearers from Kavthe Mahankal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.