शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

इस्लामपुरात शिवीगाळ, तोडफोड

By admin | Published: March 28, 2016 11:40 PM

रंगपंचमीला गालबोट : उरुण परिसरात वाहनांच्या काचा फोडल्या

इस्लामपूर : इस्लामपूर शहरात नेहमी शांततेने साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीच्या रंगारंग उत्सवाला आज गालबोट लागले. उरुण परिसरात अनोळखींच्या वाहनाची तोडफोड, रिक्षाचालकाला मारहाण, तर शिरटे येथे एका युवकाला रंग लावण्याच्या कारणावरुन शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. पोलिसांनी दुपारनंतर कारवाईचा बडगा उगारत २० दुचाकीस्वारांसह रंग खेळताना हुल्लडबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.शहरात आज सकाळपासून लहान मुले वगळता इतरांनी पाण्याच्या वापराला फाटा देत रंगांची उधळण करीत कोरडी रंगपंचमी खेळण्यास सुरुवात केली. युवकांचे जथ्थे रंगलेल्या चेहऱ्यांनी दुचाकीवरुन रपेट मारत असल्याचे दिवसभर दिसत होते. शहरातील विविध चौका-चौकात त्या परिसरातील युवक रंगपंचमीचा हा आनंद लुटत होते.सकाळपासून शांततेत आणि उत्साहात सुरु असणाऱ्या या रंगपंचमीला दुपारनंतर उरुण परिसरात गालबोट लागले. प्रदीप सर्जेराव पाटील (रा. पाटील गल्ली) याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. तो आपल्या रिक्षातून हे साहित्य घेऊन जात असताना हर्षद दिलीप देसाई, योगेश पवार, वैभव अधिकराव पवार, निखिल फार्णे व इतरांनी त्याला अडवून धक्काबुक्की व शिवीगाळ करीत रंग फासला. त्यानंतर त्याच्या साहित्यावर रंगाचे पाणी ओतून नुकसान केले. याचवेळी तेथून जाणाऱ्या एका अनोळखी युवकाच्या कारच्या मागील काचेची तोडफोड केली. या प्रकारामुळे तेथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. वाहतूक शाखेसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश देत तरुणाईचा या बेभान उत्साहाला त्यांनी चाप लावायला सुरुवात केली. सायंकाळपर्यंत ट्रिपल सीट जाणाऱ्या २0 दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. गांधी चौकात मोठ्या आवाजात स्पिकर लावून गोंधळ माजवणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या शालेय शिक्षणात अडथळे येऊ नयेत म्हणून काही काळ स्थानबध्द केल्यानंतर ताकीद देऊन सोडून देण्यात आले. (वार्ताहर)