ओळ : मिरजेत तेजाेपासना परिवारातर्फे आयाेजित सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या श्रद्धा गोखले-लेले यांचा डॉ. मुकुंदराव पाठक, योग शिक्षक मुकुंद दात्ये, विशाल दुर्गाडे, डाॅ. रवींद्र ताटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मिरज : मिरजेत तेजोपासना परिवारातर्फे रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनी १ लाख ११ हजार १११ सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेत मिरजेतील श्रद्धा गोखले-लेले यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
तेजोपासना परिवारातर्फे वर्षभर सूर्यनमस्काराचा उपक्रम राबविण्यात येतो. ६ वर्षांच्या बालकापासून ७५ वर्षांपर्यंत ज्येष्ठांचा यात सहभाग आहे. मकरंद खाडिलकर व मृणाल खाडिलकर यांच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात येते. परिवारातील सर्व सहभागींनी जागतिक सूर्यनमस्कार दिनी १ लाख ११ हजार १११ सूर्यनमस्कारांचा संकल्प पूर्ण केला. लक्ष सूर्यनमस्काराच्या सांगता समारंभात स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या श्रद्धा गोखले-लेले यांना डॉ. मुकुंदराव पाठक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सायली पगार, सचिन नाईक, अमेय कुलकर्णी, कविता इंगळे, उज्वला पाटील, डॉ. मनीषा इरळी, उर्मिला वसगडेकर, संतोष पाटील यांनाही सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे योग शिक्षक मुकुंद दात्ये, महापालिका आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल दुर्गाडे, क्रीडाअधिकारी रवीभूषण कुमठेकर मोहन वाटवे उपस्थित होते. यावेळी सहभागी योगपटूंना मकरंद खाडिलकर, ॲड. मृणाल खाडिलकर यांनी संयोजन केले.