आष्टा : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक विभागात श्रावणी हैबती हिने, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात विशाल ठाकर याने व तर महाविद्यालय विभागात प्रतीक पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक विभागात आर्यन बंडगर, साक्षी बाबर, जुईली पाटील, श्रेया कोडग यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात वेदांती हेरवाडे, श्रद्धा तोडकर, मधुरा माळी, प्रसन्ना सूर्यवंशी यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. महाविद्यालयीन विभागात प्रियदर्शनी पाटील, आशुतोष निकम, सोनल भिऊगडे यांनी द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत प्राथमिक विभागात वृंदा गोईलकर, यश मोहिते, प्रथमेश शिंदे, पूर्वा माने व शिवराजे राऊत यांनी, तर माध्यमिक विभागात प्रतिभा इथापे, राम दर्शन कोळी, निशा निकम, पीयूष कांबळे, शुभम फागणे यांनी यश मिळविले.
निबंध स्पर्धेत प्राथमिक विभागात प्रतीक्षा सूर्यवंशी, प्राची सपकाळ, श्रुतिका पिंगळे, आस्था म्हापसेकर, वरद पवार यांनी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात वैष्णवी अवघडे, अर्जुन मोरे, यश पाटील, वैष्णवी सावंत व सानिका अकजुस्कर यांनी, तर महाविद्यालयीन विभागात कल्पेश पारधी, वेदांतिका जाधव, अक्षता पाटील, सौदामिनी बिडकर यांनी यश मिळविले.
अण्णासाहेब डांगे वाढदिवस समितीचे अध्यक्ष प्रा. आर.ए. कनाई यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अमर कांबळे, ए.के. पाटील, सुधीर थोरात, अमोल वारे यांनी संयोजन केले. स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली तसेच गोवा व कर्नाटक राज्यातील सुमारे पंधराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला.