मिरज : मिरजेतील कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर तसेच कोल्हापूर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत पदवी व पदव्युत्तर गटात शुभम पाटील तर कनिष्ठ गटात श्रेया म्हापसेकर यांनी विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत १८३ स्पर्धक सहभागी झाले होते.
संस्थेचे उपाध्यक्ष विनायक गोखले यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या स्पर्धेसाठी जे. व्ही. पाटील, प्रा. मिथुन माने, बाळासाहेब कणके, एन. व्ही. माणगावकर, प्रतिभा कुंडले, अस्लम फकीर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील कनिष्ठ गटात महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरच्या श्रेया म्हापसेकर हिने प्रथम, पद्माराजे ज्युनिअर कॉलेज शिरोळ येथील प्रज्ञा माळकर हिने द्वितीय, शासकीय तंत्रनिकेतन, कऱ्हाडच्या आदित्य माने याने तृतीय तर विश्वसेवा ज्युनिअर कॉलेजच्या विश्वजित पाटील याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. पदवी व पदव्युत्तर विभागात महावीर कॉलेज, कोल्हापूरच्या शुभम पाटील याने प्रथम, नाईट कॉलेज, इचलकरंजीच्या अक्षय इळके याने द्वितीय, सातारा यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या आशुतोष निकम याने तृतीय व भोगावती महाविद्यालय, कुरुकलीच्या विवेकानंद पाटील याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
विजेत्यांना संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांच्या हस्ते पारिताेषिक देण्यात आले. प्रभारी प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी, उपप्राचार्या मंजिरी सहस्त्रबुद्धे, डॉ. जयकुमार चंदनशिवे, प्रा. पांडुरंग तपासे, प्रा. डॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रा. डॉ. माधुरी देशमुख, प्रा. सुजाता आवटी, प्रा. विनायक वनमोरे, प्रा. दीपाली आगरे, प्रा. तुषार पाटील, प्रा. सुवर्णा यमगर यांनी स्पर्धेचे संयोजन केले. प्रा. नलिनी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. मानसी शिरगावकर यांनी आभार मानले.