शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई

By संतोष भिसे | Published: October 08, 2022 8:39 PM

भैरवगड सर करणारी काजल पहिलीच दिव्यांग महिला ठरली. तिने यापूर्वी वजीर, हिरकणी कडा अशा अवघड व साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

सांगली : सह्याद्री खोऱ्यातील गिर्यारोहणासाठी कठीण श्रेणीत असलेला मोरोशीचा भैरवगड सांगलीच्या शुभांगी पाटील व दिव्यांग काजल कांबळे यांनी सर केला. ४०० फूट उंच शिखरावर यशस्वी चढाई करत नवरात्रीमध्ये स्त्रीशक्ती दाखवून दिली.

भैरवगड सर करणारी काजल पहिलीच दिव्यांग महिला ठरली. तिने यापूर्वी वजीर, हिरकणी कडा अशा अवघड व साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. मोरोशी (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथून त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. घनदाट जंगलातून दोन तासांच्या पायपिटीनंतर भैरव माचीला पोहोचले. तेथून खिंडीपर्यंत खडी चढाई केली. गडावर जाण्यासाठी कातळकड्यावरील कोरीव पायऱ्यांवरुन वाटचाल केली. पुढे निसरडा मार्ग, एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशा जीवघेण्या स्थितीत चढाई सुरु ठेवली. पुढे निवडुंगाच्या जाळीतून पूर्व- पश्चिम पसरलेल्या अरुंद गडमाथ्यावर पोहोचले.

काजल, शुभांगी आणि सहकाऱ्यांनी मानसिक व शारिरीक कस पाहणारी ही चढाई मुसळधार पावसात सर केली. अखंड चढाईमुळे येणाऱ्या मानसिक थकव्यावर मात करत भैरवगडाला पायाखाली घेतले. या मोहिमेत टीम पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या जाॅकी साळुंखे, चेतन शिंदे, महेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. पुणे, मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यांतील डझनभर गिर्यारोहक मोहिमेत सहभागी झाले होते.

काजलने कळसूबाई शिखरदेखील दोनवेळा केले सरराज्यातील सर्वाधिक उंच असणारे कळसूबाई शिखरदेखील काजलने दोनवेळा सर केले आहे. अशी ती पहिलीच दिव्यांग तरुणी ठरली आहे. त्याशिवाय दहा जलदुर्गही पायाखाली घातले आहेत. २०१० मध्ये शिकवणी वर्गाला जाताना अपघातात ट्रक पायावरुन गेला, त्यामुळे तिचा एक पाय विकलांग आहे. या कमतरतेवर मात करत गतवर्षीपासून गिर्यारोहणाचे आव्हान पेलायला सुरुवात केली. कुटुंबात आई, वडील, भाऊ असा परिवार असून सांगलीत अभयनगरमध्ये राहते. आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी गिर्यारोहणाचा सर्व खर्च स्वत:च करते. बीएनंतर सध्या एमपीएससीचा अभ्यास करत आहे. शुभांगी पलुसची रहिवासी असून तिने बीएस्सी शिक्षण पूर्ण केले आहे. कुटुंबात आई, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली