शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

निवडणुकीच्या तोंडावर ‘सैराट’ची धूम

By admin | Published: July 29, 2016 11:44 PM

इस्लामपूर पालिका : शहरात एकीकडे विकास, तर दुसरीकडे भकास परिस्थिती

अशोक पाटील -- इस्लामपूर --स्वत:चे घर, रस्ते, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती या सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु या गरजा पूर्ण करण्यात इस्लामपूर नगरपालिकेला अपयश आले आहे. तरीसुध्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या नाना—नानी पार्कच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे. याच्या उद्घाटनासाठी अबाल-वृध्दांसह युवा पिढीचे आकर्षण ठरलेल्या ‘सैराट’फेम आर्ची आणि परशा या जोडीला पाचारण करण्यात आले आहे. एकीकडे विकासाचा फार्स केला जात असला तरी, शहरातील अनेक विकास कामांचा बोऱ्या वाजला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांतून संतापाची लाट आहे.शहरातील नव्याने बांधण्यात आलेले घरकुल, पाणी योजना, महादेवनगरातील कुसूमगंध पार्क, राजारामबापू नाट्यगृह, मोफत वाय—फाय सुविधा, खत प्रकल्प आदी विकास कामांची उद्घाटने दिग्गज सिनेअभिनेत्यांच्याहस्ते केली आहेत. आता अंबाबाई उद्यानाच्या जागी ४ कोटी रुपये खर्च करुन नाना—नानी पार्क उदयास आणले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी ‘सैराट’फेम आर्ची आणि परशाला निमंत्रित केले आहे. परंतु पालिकेने याबाबत गुप्तता पाळली आहे. याची कसलीही जाहिरातबाजी केलेली नाही.सत्ताधाऱ्यांनी गेल्या ३0 वर्षात विकासकामे केल्याचा गाजावाजा केला आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्चही केले आहेत. परंतु पैशाच्या मानाने विकास कामे झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी वेळोवेळी केला आहे. परंतु त्यांची ताकद तोकडी असल्याने विरोधकांना न जुमानताच सत्ताधाऱ्यांनी आपला हम करेसो कायदा सुरु ठेवला आहे. आतापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोहण्याचा तलाव, घरकुल योजना, नाट्यगृहातील ध्वनी व्यवस्था, तसेच नवीन पाणी योजना असूनही अनेकांना मिळत नसलेले पाणी, कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले रस्ते पहिल्याच पावसात खराब झाले आहेत, आदी विकास कामांतील त्रुटी समोर आल्या आहेत.निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी राष्ट्रवादीला विकासाचे वेड लागते. रस्त्यांची डागडुजी, दिवाबत्ती नूतनीकरण, एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी सिनेअभिनेते आणून मते पदरात पाडून घेण्याचा प्रकार केला जातो, हे आता सर्वसामान्यांनाही ज्ञात झाले आहे.