कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 08:15 PM2023-06-25T20:15:22+5:302023-06-25T20:15:55+5:30

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला.

Siddaramaiah will take a decision on providing water from Karnataka to the border areas of Maharashtra | कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या

कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या

googlenewsNext

सांगली : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्राच्या सीमा भागातील दुष्काळी गावांना पाणी देण्याबाबत लवकरच मंत्रीमंडळात चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगलीतील कार्यक्रमात दिले.

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कर्नाटकचे उद्योग मंत्री एम. बी. पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. सतेज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. मोहनराव कदम, आ. जयंत असगावकर, आ. आर. व्ही. देशपांडे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, आ. प्रकाश हुक्केरी, आ. बसवराज पाटील, मधुकर चव्हाण, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, शैलजाभाभी पाटील आदी उपस्थित होते.

सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच जातीयवादी राजकारण केले. लोकशाही व घटनेविरोधातले हे लोक आता सत्तेवर आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही टिकली तरच सामान्य माणूस सुखात राहील, अन्यथा या देशात लोकशाहीशिवाय जगणे मुश्कील होऊन जाईल.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी कर्नाटकात ज्याठिकाणी रोड शो, सभा घेतल्या तिथे भाजप पराभूत झाला. त्यामुळे मोदींची जादू पूर्णत: संपल्याचे हे द्योतक आहे. कर्नाटकात आजपर्यंत कधीही भाजप जनतेतून निवडून आला नाही. ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून आमदार विकत घेऊन ते सत्तेवर आले आहेत. अनेक बऱ्याच राज्यात हाच फर्म्युला त्यांनी वापरला. त्यामुळे जनतेने त्यांना केव्हाच नाकारले आहे. महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेतील भाजपला दूर करावे.

सिद्धरामय्या म्हणाले की, कर्नाटकात गरिबांसाठी मोफत धान्याची योजना आम्ही सुरु केली, मात्र गरिबांना मोफत धान्य मिळू नये म्हणून केंद्रातील मोदी सरकारने भारतीय अन्न महामंडळावर दबाव आणला. आता कर्नाटकातील तांदूळ पुरवठा बंद झाला आहे.

‘आदिपुरुष’च्या मागे भाजप
रामायणावरील ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बनविण्यामागे भाजपच आहे. याच चित्रपटात राम, हनुमान या देवतांचा मोठा अवमान करण्यात आला. महापुरुषांचा अवमान करणारे आता देवांचाही अवमान करीत आहेत, अशी टिका नाना पटोले यांनी केली.
 

Web Title: Siddaramaiah will take a decision on providing water from Karnataka to the border areas of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.