शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

विरोधकांची मोट अहंकाराच्या वाटेवर

By admin | Published: April 12, 2016 10:16 PM

राजू शेट्टी यांच्यापुढे आव्हान : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीचे वारे

अशोक पाटील -- इस्लामपूर -इस्लामपूर पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले की, विरोधकांना खडबडून जाग येते. त्यानंतर नेतृत्वाची भाषा सुरु होते. नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ऐन निवडणुकीत विरोधी गटातील प्रमुखांचा अहंकार जागा होतो. या अहंकारातूनच द्वेष निर्माण होतो. त्यामुळेच सत्ताधारी राष्ट्रवादी या विरोधकांना नगण्य समजते. आगामी पालिका निवडणुकीसाठी खासदार राजू शेट्टी विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढे आले असले तरी, त्यांना हे आव्हान पेलण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात मातब्बर नेते आहेत. यामध्ये प्रामुख्याने खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आणि काँग्रेसमधील काही नेत्यांचा समावेश होतो, तर प्रत्यक्षरित्या विरोधी गटातून पालिकेच्या रणांगणात उतरणाऱ्यांमध्ये वैभव पवार, विजय पवार (प्रभाग २), दादा पाटील (प्रभाग ३), आनंदराव पवार (प्रभाग ४), बाबासाहेब सूर्यवंशी, जयकर पाटील (प्रभाग ५), सनी खराडे (प्रभाग ६), जलाल मुल्ला (प्रभाग ७), सतीश महाडिक (प्रभाग ८), विक्रम पाटील (प्रभाग ९), चेतन शिंदे (प्रभाग १0), अमित ओसवाल (प्रभाग ११), कपिल ओसवाल (प्रभाग २१), एल. एन. शहा (प्रभाग २२), विजय कुंभार (प्रभाग २३) हे आघाडीवर असणार आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांचाही भरणा होण्याची शक्यता आहे. विरोधी गटातील उमेदवारी ठरवताना गटप्रमुखांचा अहंकार जागा होत असल्याने, सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे करण्यात विरोधकांना अपयशयच आले आहे.याबाबत विक्रमभाऊ पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या तरी विरोधकांची एकत्र आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा विचार नाही. आगामी पालिकेच्या निवडणूक धोरणाविषयी अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जो आदेश येईल त्याप्रमाणे धोरण अवलंबले जाईल. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील १ हजार कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शहरातील १0 ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतरच पालिका निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. याउलट राहुल महाडिक यांची भूमिका वेगळीच आहे. ते म्हणाले, अगोदर विरोधकांनी एकदिलाने एकत्र यावे. निवडणूक जिंकल्यानंतर खुर्चीसाठी भांडावे. परंतु असे कधीही होत नाही. याचाच फायदा सत्ताधाऱ्यांनी उठवला आहे. कपिल ओसवाल, अमित ओसवाल, चेतन शिंदे, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, उदय पाटील, गाईड कांबळे हे महाडिक गटाच्या आदेशाचे पालन करणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी अद्याप उघडपणे भूमिका मांडलेली नाही. त्यांच्यासह त्यांचे बंधू उमेश पवार, शकील सय्यद व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी देऊन सर्व ठिकाणी उमेदवार देण्याची भाषा त्यांनी सुरु केली आहे.काँग्र्रेसचे वैभव व विजय पवार हे सख्खे बंधूही निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते विजय कुंभार हे एकाकी लढत देत आहेत. यांना एकत्र आणणे म्हणजे शेट्टी यांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.इस्लामपूर पालिकेत माझा वैयक्तिक स्वार्थ नाही. सर्व विरोधकांना एकत्रित करुन सक्षम आघाडी निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात वारंवार बैठका घेणार आहे. वाळवा तालुक्यात विरोधकांच्यात सक्षम नेतृत्व तयार झाले पाहिजे. त्याला यश आले नाही. परंतु आगामी पालिका निवडणुकीत सर्वांना एकत्रित करुन सत्ता मिळविण्यात आपणास निश्चित यश मिळेल.- राजू शेट्टी, खासदार.राष्ट्रवादी विरोधात मातब्बर नेते राष्ट्रवादीच्या विरोधात मातब्बर नेते आहेत. यामध्ये प्रामुख्याने खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आणि काँग्रेसमधील काही नेत्यांचा समावेश आहे.