शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सांगलीतील मौजे डिग्रज परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल; वनविभागाकडून पाहणी

By शरद जाधव | Published: July 20, 2023 12:21 PM

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

सांगली : मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ग्रामस्थांना दर्शन झाले. गेल्या आठवड्यापासून कर्नाळ, बिसूर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा होती. आता या भागातही शेतातील रस्त्यावर प्राणी फिरताना आढळला. अनेकांनी याचे व्हिडीओ व्हायरल केले मात्र, वनविभागाच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या नसून दुसराच प्राणी आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास मौजे डिग्रज ते नांद्रे हा कमी वर्दळीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या तरूणांना या प्राण्याचे दर्शन झाले. त्यांनी याचे चित्रण केले. यात अगदी शांतपणे हा प्राणी रस्ता ओलांडताना दिसतो. शिवाय तो चिखलाने माखलाही आहे. मात्र, बिबट्याच असेल याबाबत ते तरूणही साशंक आहेत. याशिवाय अन्य एका व्हिडीओमध्ये पाणी पिण्यासाठी हौदाजवळही हाच प्राणी आढळून आला. गेल्याच आठवड्यात कर्नाळजवळ शेतकऱ्यांवर एका प्राण्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता नंतर दोनच दिवसात जवळच असलेल्या बिसूर गावातच प्राण्याचे दर्शन झाले होते. बिसूरमध्ये एका दुकानाबाहेरील सीसीटिव्हीमध्येही त्या प्राण्याच्या हालचाली दिसून येतात. यानंतर आता त्याच भागात मौजे डिग्रज परिसरात प्राण्याचे दर्शन झाले आहे. हा बिबट्याच की अन्य कोणता याबाबत वनविभागाकडून तपास केला जात आहे.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग