गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. मंगळवारी रात्री इस्लामपूर ते आष्टा रस्त्यावरील बावची फाट्याच्या पश्चिम बाजूच्या रकटे डेअरीजवळ बिबट्या रस्ता ओलांडताना काही वाहनधारकांना दिसला. काहींनी वाहन थांबवून त्याची छबी मोबाइलमध्ये कैद केली. ही छबी समाजमाध्यमांवर जाेरदार व्हायरल झाली आहे.दोन दिवसांपूर्वी संतोषगिरी डोंगर परिसरात धोंडी पाटील मळा, खोत मळा परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मंगळवारी रात्री इस्लामपूर-आष्टादरम्यान रस्ता ओलांडून बिबट्या परत डोंगर परिसरात गेला असावा अशी चर्चा होत आहे. बिबट्याचे इटकरेकडून मल्लिकार्जुन डोंगर, गोटखिंडीतील टक्केश्वर डोंगर ते संतोषगिरी डोंगर परिसरात नेहमी वावर असतो, सध्या परिसरातील उसाचे फड मोकळे होऊ लागले आहेत. बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले आहेत.
इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन, शेतकरी धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:44 AM