या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा चर्चेची ठरली. ही स्पर्धा पुण्यात झाली. या स्पर्धेतील पै. सिकंदर शेखचा अंतिम सामना वादाचा ठरला. यातील काही गुण चुकीच्या पद्धतीने सिकंदरच्या विरोधी पैलवानाला देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला. दरम्यान, सोशल मीडियावरही यावरुन चर्चा रंगली. आता पै. सिकंदर शेख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण काल सांगलीतीलकुस्ती स्पर्धेत पै. सिकंदर शेखने पंजाबच्या गोपी पंजाब या मल्लाला एका मिनिटात चितपट केले. यावरुन पुन्हा सिकंदर शेखच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
काल सांगलीतील ट्रबल शुटिंग सोशल वेलफेअर फौंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सांगलीतील कृष्णा काठावरील सरकारी घाट परिसरात अॅश्ले गार्डनर मालिकावीर ठरत सुमारे पाच तास हे मैदान रंगले.
Raj Thackeray: शिवसेना पक्ष योग्य माणसांच्या हाती गेला का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
या स्पर्धेत सिकंदरने गोपी पंजाबबरोबर खडाखडी करुन ताकदीचा अंदाज घेतला. पाठीवरून मागे येत काही क्षणातच आतून आकडी डाव टाकला. चपळतेने एकचाक डावाचा वापर करत अवघ्या दुसऱ्या मिनिटाला गोपीला चितपट केले. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची कुस्तीही जोरदार झाली. या कुस्तीत महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख याने पै. भारत मदनेवर विजय मिळवला.
सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेपासून चांगलाच चर्चेत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला. यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले.