कणकवली : कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवासाठी एस. टी. प्रशासनाने नियोजनबद्धरित्या राबविलेल्या कार्यक्रमामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद एसटी सेवेला मिळाला. त्यामुळे एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला ४२ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २३ लाखांनी उत्पन्न कमी झाले आहे. यावर्षी एसटीच्या २७0 फेऱ्यांच्या माध्यमातून १४ हजार ५३५ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. तर गतवर्षी ३६८ बसफेऱ्या झाल्या होत्या. एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातील ७ एसटी आगारांनी १८ ते ३0 सप्टेंबर या कालावधीत जादा गाड्यांची सोय भाविकांसाठी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत ९८ गाड्या यावर्षी कमी होत्या. यावर्षी सिंधुदुर्ग विभागातून १९३ गाड्या सोडण्यात आल्या. तर २७0 फेऱ्या झाल्या होत्या. गतवर्षी ३0१ गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर या गाड्यांच्या माध्यमातून ३६८ फेऱ्या झाल्या होत्या. यावर्षी १ लाख ३६ हजार २११ कि.मी. चा प्रवास एस.टी.च्या गाड्यांनी केला आहे. त्यातून १४ हजार ५३५ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. गतवर्षी १ लाख ८३ हजार २९५ कि.मी. च्या प्रवासातून २0 हजार ५४0 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली होती. यावर्षी सिंधुदुर्ग विभागाला ४२ लाख ३ हजार ५५४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी हे उत्पन्न ६५ लाख २८ हजार ५0८ रुपये होते. १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीसाठी मुंबईहून सिंधुदुर्गमध्ये १७३ गाड्या आल्या होत्या. यातूनही महामंडळाला २२ लाख ४३ हजार ६६१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गणेशोत्सवामध्ये रेल्वेबरोबरच एस.टी.लाही प्रवासासाठी भाविक पसंती देत आहेत. मात्र, एस.टी.च्या सेवेत अजूनही चांगल्याप्रकारे सुधारणा होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एस.टी.च्या स्थानकांवर स्वच्छतेबरोबर विविध सुविधा प्रवाशांना उपलब्ध झाल्यास त्यांचा ओघ आपोआपच एस.टी.कडे वळणार आहे. खासगी वाहनांच्या वाहतुकीमुळे एस.टी.च्या सेवेवर परिणाम होत आहे. त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)सुरक्षित सेवेमुळे एस.टी.लाच सर्वाधिक पसंतीगतवर्षी ३६८ फेऱ्यांच्या माध्यमातून एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला ६५ लाख २८ हजार ५0८ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी १८ ते ३0 सप्टेंबर या कालावधीत एसटीने मुंबई, बोरीवली आदी भागासाठी जादा गाड्या सुरू केल्या होत्या. बांदा ते राजापूर या भागात महामार्गावर एसटीच्या गाड्यांद्वारे गणेशोत्सवाच्या कालावधीत पेट्रोलिंग करण्यात आले. तर तळेरे येथे चेकपोस्टही उभारण्यात आले होते. २४ तास कार्यरत असलेल्या या चेकपोस्टवर पर्यवेक्षक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांसह ब्रेकडाऊन व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली होती. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला असल्याची माहिती एस.टी.सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली. सिंधुदुर्ग विभागाला मिळालेले उत्पन्नएसटी आगारफेऱ्याउत्पन्नसावंतवाडी४७७,३५,९६२वेंगुर्ले0८१,१९,४६४कुडाळ२२४,५५,३७५मालवण१८२,७२,४६३कणकवली९६१३,८२,१२५देवगड४९८,0१,३५४विजयदुर्ग३0४,३६,७११सिंधुदुर्ग विभाग२७0४२,0३,४५४
सिंधुदुर्ग विभागाला ४२ लाखांचे उत्पन्न
By admin | Published: October 09, 2015 10:57 PM