सांगली : महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांटसाठी मुदतीत एकच निविदा दाखल झाली आहे. स्थायी समितीकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असून हा प्लांट उभारण्यास अद्याप दोन महिने लागण्याची शक्यता आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेमार्फत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १ कोटी १९ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. मात्र, या कामासाठी एकच निविदा दाखल झाल्याने पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतही संपली असून या मुदतीतही एकच निविदा दाखल आहे. त्यामुळे आता निविदा प्रक्रियेत आणखीन वेळ न घालवता दाखल झालेली निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी दोन महिने लागतील. त्यामुळे दुसऱ्या लाटेत याचा फायदा होणार नाही, ही तिसऱ्या लाटेची तयारी असल्याचे प्रशासनाने सांगितले.