शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दोन व्यापाऱ्यांकडून सहा लाख वसूल

By admin | Published: April 05, 2016 11:39 PM

एलबीटीप्रश्नी कारवाई : मिरजेत महापालिकेची मोहीम; कागदपत्रे केली जप्त

मिरज : मिरजेत महापालिका अधिकाऱ्यांनी थकित एलबीटी वसुली मोहिमेस आज सुरुवात केली. एलबीटीसाठी नोंदणी न करणाऱ्या आकाश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील कागदपत्रे जप्त करण्यात आली. रंगरेज जनरल स्टोअर्सच्या चालकाकडून ८७ हजार एलबीटी वसुली करण्यात आली. दोन्ही व्यापाऱ्यांकडून सहा लाख रुपयांची वसुली झाली आहे. विनानोंदणी व नोंदणी करूनही कर न भरणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात कारवाईची मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांनी सांगितले. महापालिका हद्दीतील बारा हजार व्यापारी आहेत. त्यापैकी नऊ हजार व्यापाऱ्यांनी एलबीटीतर्गंत नोंदणी केली आहे. यातील साडेपाच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला असून विवरणपत्रही दाखल केले आहे. साडेतीन हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी करूनही एलबीटी भरलेला नाही. शिवाय तीन हजार व्यापारी विनानोंदणीच दोन वर्षे व्यवसाय करीत आहेत. गेल्या आठवड्यात महापौर हारूण शिकलगार यांनी विनानोंदणी व कर न भरलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने मंगळवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. महापालिका उपायुक्त सुनील पवार, सहायक आयुक्त रमेश वाघमारे, निरीक्षक अमर छाचवाले यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी मार्केट परिसरातील आकाश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाची तपासणी केली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणाऱ्या संबंधित दुकानदाराने महापालिकेकडे दोन वर्षे नोंदणी न करता व्यवसाय केल्याचे निष्पन्न झाले. महापालिकेच्या पथकाने दुकानातील मालाची तपासणी केली. संबंधित दुकानातील कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेऊन दुकानचालकाकडून पाच लाखांचा धनादेश घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दर्गा चौकातील रंगरेज स्टोअर्सच्या चालकाने एलबीटीतर्गत नोंदणी केली होती. पण एलबीटी भरलेला नव्हता. त्याला कर भरण्यासाठी नोटीसही बजाविण्यात आली होती. त्याच्याकडून ८७ हजार रुपये थकित एलबीटी वसूल करण्यात आली. (वार्ताहर)तर दोनशे कोटींची एलबीटी वसूल होईल...विनानोंदणी व कर न भरलेल्या साडेसहा हजार व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसुली झाल्यास ती दीडशे कोटीच्या घरात जाऊ शकते, असा अंदाज आहे. दोनच व्यापाऱ्यांकडून सहा लाख वसूल झाले आहेत. शिवाय विवरणपत्र तपासणीतून पन्नास कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. एलबीटीची संपूर्ण वसुली झाल्यास पालिकेच्या तिजोरीत दोनशे कोटी जमा होऊ शकतात, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आता जप्ती : नंतर थेट फौजदारी करणार महापालिकेने एलबीटीत नोंदणी केलेले, पण कराचा भरणा न केलेले साडेतीन हजार व विनानोंदणी तीन हजार अशा साडेसहा हजार व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या व्यापाऱ्यांना पूर्वी नोटिसा दिल्या होत्या. पण त्यांनी महापालिकेला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता नोंदणी न केलेले व कर न भरलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय व्यापाऱ्यांवर फौजदारीही दाखल करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.