वाळवा : वाळवा येथे शुक्रवारी आणखी ६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. गुरुवारी गावात १२ रुग्ण आढळून आले होते. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत बाधितांची संख्या २८५ झाली आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील लोक बाहेर फिरत असल्याने संसर्ग वाढत असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव नायकवडी यांनी सांगितले.
वाळवा येथे अद्याप १८ ते ४४ वयाेगटांतील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झालेले नाही. लसींचा योग्य तो पुरवठा झाला की लसीकरण सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी यांनी सांगितले. दुसरीकडे लाॅकडाऊन असतानाही भाजीपाला व इतर विक्रेते गावांतून फिरताना आढळून येत आहेत. घरांतून बाहेर पडणारे लाेकही मास्कचा वापर योग्य प्रकारे करताना दिसत नाहीत.