शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sangli: कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटी उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून देशात प्रसिद्ध

By श्रीनिवास नागे | Updated: July 29, 2023 17:29 IST

दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा

प्रताप महाडीक  कडेगाव : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपुर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षांची परंपरा लाभलेल्या कडेगाव जिल्हा सांगली येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला हा सोहळा थाटात संपन्न झाला. शनिवार(दि २९) सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापुर, सोहोली, निमसोड, वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत- गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी ११ वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान , आत्तार, शेटे, माईनकर आणि अन्य उंच ताबूत माना प्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला. आणि सातभाई पाटील - बागवान - अत्तार - हकीम, या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 11.30 वाजता संपन्न झाल्या.सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले. इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद.. धूला धूला आशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान वाटेत तांबोळी, शेटे व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर माईनकर यांचा ताबूत उचलण्यात आला. मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत माना प्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित केले गेले. त्या ठिकाणी मेलवाल्याकडून ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे’ या ऐक्याच्या संदेशाने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे मानकऱ्यामार्फत आणण्यात , आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. या ठिकाणी माना प्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने १२५ ते १५० फूट उंचीच्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले. दुपारी २.३० वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले.यावेळी  माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जि.प.अध्यक्ष संग्रामसिह देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, डॉ जितेश कदम, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार  पाटील, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम आदी मान्यवर व नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांचेसह हिंदू-मुस्लिम बांधव, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली