शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सांगली जिल्ह्यातील कडेगावात मोहरामनिमित्त गगनचुंबी ताबूतांच्या भेटी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:15 PM

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या  कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार  व डोळ्यांचे पारणे फेडणारा  सोहळा शुक्रवारी हजारो  भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश डोळयांचे पारणे फेडणारा सोहळा संपन्न 

कडेगाव :हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार  व डोळ्यांचे पारणे फेडणारा  सोहळा शुक्रवारी  हजारो  भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.महान भारत देश आपला घुमऊ जय जय कार ,प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे’ या ऐक्याच्या तसेच देशभक्तीपर गीतांनी व संदेशानी परिसर दुमदुमून गेला.

या हुसेन दुला,या इमामो दुला अशा गजरात मोहरमनिमित्त येथे १२५  ते १५० फूट उंचीच्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटी सुरेश बाबा देशमुख मोहरम  चौक येथे संपन्न  झाल्या.  हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो  भाविक आले होते. विशेषतः सांगली , सातारा, कोल्हापूर, सोलापूर ,पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.

सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर, निमसोड, सोहोली, कडेपूर ,नेर्ली आदी गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत ताबूताच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर पूजा करून मानाचा सातभाई यांचा उंच ताबूत सकाळी ११.४५ वाजता उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.

हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात  आणण्यात आले. त्यानंतर बागवान यांचा उंच, आत्तार, शेटे यांचे ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर सातभाई पाटील, सातभाई बागवान, सातभाई आत्तार ,सातभाई हकीम,या उंच ताबूतांच्या भेटी दुपारी सव्वाबाराला झाल्या.त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूदमाला ताबूत व पंजे, बारा इमामचे पंजे, नालसाहेब यांचे पंजे , तांबोळी ,इनामदार व सुतार यांचे ताबूत आणले गेले. सर्व ताबूत माना प्रमाणे सुरेश बाबा देशमुख -मोहरम चौकात  एकत्रित केले गेले. त्यानंतर दुपारी दीडला ताबूत उचलण्यात आले व मुख्य भेटीचा सोहळा सुरू झाला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या  नेत्रदीपक  सोहळ्यात गगनचुंबी ताबूत पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध  झाले होते . या ठिकाणी मानाप्रमाणे सर्व ताबूतांच्या भेटी झाल्या.आमदार विश्वजीत कदम , जि.प .अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख , जि. प .सदस्य शरद लाड, युवा नेते डॉ. जितेश कदम, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, तहसीलदार अर्चना शेटे, डी.वाय .एस .पी. अमरसिंह निंबाळकर, भाजप राज्य सरचिटणीस राजाराम गरुड, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, जेष्ठनेते चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, युवा नेते  हर्षवर्धन कदम, युवक काँग्रेसचे राज्य सचिव इंद्रजित साळुंखे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, उपनगराध्यक्ष साजिद पाटील आदी उपस्थित होते

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSangliसांगली