शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
4
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
5
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
6
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
7
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
8
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
9
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
10
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
11
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
12
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
13
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
15
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
16
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
17
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
18
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
19
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
20
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."

स्त्रियांच्या गुणोत्तर प्रमाणात अत्यल्प वाढ

By admin | Published: July 10, 2015 11:47 PM

जिल्ह्याची स्थिती : चौदा वर्षांत हजार पुरुषांमागे ९६६ महिला; साक्षरतेतही पिछाडी

अविनाश कोळी - सांगली -प्रबोधन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करूनही सांगली जिल्ह्यात गेल्या १४ वर्षात स्त्रियांच्या गुणोत्तर प्रमाणात केवळ १.१ टक्काच वाढ झाल्याची माहिती चालू आकडेवारीतून समोर आली आहे. २00१ मधील जनगणनेत १ हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९५७ इतकी होती. आता ही संख्या ९६६ झाली आहे. साक्षरतेच्या बाबतीतही पुरुषांपेक्षा महिला अजूनही खूप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पन्नास वर्षांपूर्वी २३.५ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर २०११ मध्ये ९.१८ टक्क्यांवर आला आहे. २0१५ मध्ये त्यात काहीअंशी भर पडली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्याची लोकसंख्या सध्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी आहे. यात सर्वात चिंताजनक आकडेवारी स्त्री-पुरुष गुणोत्तराची आहे. विशेषत: गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील स्त्रियांची संख्या कमी आहे. ग्रामीण भागात २00१ मध्ये १ हजार पुरुषांमागे स्त्रियांंची संख्या ९६२ होती. २0११ मध्ये ही संख्या ९६५ वर गेली आहे. शहरातील स्त्रियांची संख्या २00१ मध्ये ९४३ होती. ती २0११ मध्ये ९६३ झाली आहे. जिल्ह्यातील नागरीकरणाचा आढावा घेतला, तर १९९१ ते २00१ या दशकात १६.९ टक्क्यांनी नागरीकरण वाढले होते. २00१ ते २0११ या दशकात मात्र नागरीकरण वाढीचा वेग केवळ ९.२ टक्के इतकाच दिसून येत आहे. सध्या जिल्ह्याचा २५.५ टक्के भाग नागरी आहे. १९६१ ते २००१ या चाळीस वर्षांच्या कालावधित जिल्ह्यातील शहरीकरण ८.९१ टक्क्यांनी वाढले आहे. तितक्याच प्रमाणात ग्रामिणीकरण घटल्याचे दिसून येते. पन्नास टक्के आरक्षणाची लढाई जिंकणाऱ्या महिलांच्या साक्षरतेचे प्रमाणही अजून समाधानकारक नाही. जिल्ह्यात २०११ पर्यंत साक्षरतेत अजूनही महिला पुरुषांच्या कितीतरी मागे असल्याचे दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या साक्षरतेची टक्केवारी १५.७४ टक्क्यांनी कमी आहे. ड्रेनेजची गंभीर स्थितीसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राची स्वतंत्र माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार महापालिका क्षेत्रातील ३५.५ टक्के लोकवस्तीत उघड्या गटारी आहेत, तर २६.५ टक्के लोकवस्तीत ड्रेनेजच नाही. केवळ ३८ टक्के लोकवस्तीलाच बंदिस्त ड्रेनेजची सुविधा मिळाली आहे. साक्षरता टक्केवारी वर्ष पुरुष स्त्री१९६१ ४१.८ १३.६१९७१ ५0.९८ २३.८४१९८१ ५९.६८ ३३.६५१९९१ ७४.८३४९.९४२00१८६.२६ ६६.७३२0११ ९0.४0७४.६६लोकसंख्या आकडे१९६१ १२,३१,000१९७१ १५,४0,000१९८१ १८,३४000१९९१ २२,0९,000२00१ २५,८३,000२0११ २८,२0,५७५२0१५ २८,२२,१४३मनपा क्षेत्रात २५.५ टक्के लोकसंख्या भाड्याच्या घरातसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात मालकीची घरे असणाऱ्यांची संख्या ७१ टक्के असून २५.५ टक्के लोक भाड्याच्या घरात राहत आहेत. झोपडपट्टी किंवा अतिक्रमण केलेल्या जागेत राहणाऱ्यांची संख्या ३.५ टक्के आहे.