शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सांगली जिल्ह्यात ६.८९ लाख वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर, ग्राहकांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 4:32 PM

सांगली : घरगुती, वाणिज्य, औद्योगिकसह जिल्ह्यातील सहा लाख ८९ हजार ४७५ वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरणने खासगी कंपनीची ...

सांगली : घरगुती, वाणिज्य, औद्योगिकसह जिल्ह्यातील सहा लाख ८९ हजार ४७५ वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरणने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. येत्या महिन्याभरात जिल्ह्यात कृषी वगळता सर्वच वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील वीज ग्राहकांना पुढील महिन्यापासून तुमच्या वीज वापरासाठी आगाऊ पैसे भरावे लागतील. केंद्र सरकारने अलीकडेच एक प्री-पेमेंट योजना लागू केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना वीज वापरण्यापूर्वी पैसे भरावे लागणार आहेत. जेणेकरून जास्त वीज बिल आणि चोरीला आळा घातला जाईल. पारंपरिक वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवले जातील. हे स्मार्ट मीटर बसवणे आता जिल्ह्यातील सहा लाख ८९ हजार ४७५ वीज ग्राहकांना बंधनकारक आहे.यामुळे या स्मार्ट मीटरची सत्यता, त्यांची कार्यक्षमता, ते ग्राहकांना देत असलेले फायदे, ते ऊर्जा बचतीला चालना देतील की नाही आणि देयक संपल्यानंतर वीजपुरवठा तत्काळ खंडित केला जाईल का, अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. १५ जूननंतर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

स्मार्ट मीटर कसे काम करेल?मोबाइल डिव्हाइस वापरण्यापूर्वी रिचार्ज करू शकतो. त्याचप्रमाणे, तुमच्या घरातील विजेचा वापर जसजसा वाढेल तसतसा रिचार्जचा निधी कमी होईल. मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे घरामध्ये किती वीज वापरली जाते आणि उर्वरित रिचार्ज शिल्लक यासंबंधीची माहिती ग्राहकांना उपलब्ध होईल. ग्राहकाचे पेमेंट संपल्यानंतर या प्रीपेड स्मार्ट मीटरमधील वीजपुरवठा आपोआप खंडित होईल.

सांगली जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविणारी कंपनी नियुक्त केली नाही. सध्या कुठेही स्मार्ट मीटर बसविले नाहीत. पण, स्मार्ट मीटर बसविण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा निश्चित झाल्यानंतर स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. - धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

जिल्ह्यातील वीज ग्राहकसांगली - ग्राहकघरगुती : ६१७१०८वाणिज्य : ५७३९४औद्योगिक : ११५३५पथदिवे : ३३०९

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरणelectricityवीज