इस्लामपूर : शहरातील कापूसखेड नाका येथील स्मशानभूमीत कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांवर मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या स्मशानभूमीशेजारी असणाऱ्या एकात्मिक योजनेतील घरकुल रहिवाशांना येथील धूर आणि दुर्गंधीचा त्रास होत आहे. यातून मार्ग काढून सुटका करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. त्यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.
महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रोझा किणीकर, मनीषा पेठकर, उषा मोरे, शैलजा जाधव, अंजना प्रकाश माने, छाया रमेश यादव, सुहास सुरेश कांबळे, रंजना कांबळे, माधुरी सुतार, सागर प्रकाश यादव उपस्थित होते. सबनीस यांनी मागणीचा गांभीर्याने विचार करून मार्ग काढू, अशी ग्वाही दिली.
फोटो ओळी- इस्लामपूर येथे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देताना रोझा किणीकर, मनीषा पेठकर, उषा मोरे, शैलजा जाधव व घरकुल वसाहतीतील महिला उपस्थित होत्या.