अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : समृद्धीच्या चाकांवर स्वार होत धडधडणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील धुराड्यांमधून आता मंदीचा धूर सर्वदूर पसरत आहे. विविध कारणांनी आलेल्या मंदीमुळे उद्योजक, कामगार, छोटे व्यावसायिक, विक्रेते अशा घटकांनी बनलेल्या अर्थचक्राला मोठा दणका बसला आहे. औद्योगिक वसाहतींमधील ६० टक्के उलाढाल ठप्प झाली असून, ५० टक्के कामगारांच्या वेतनात आता कपात झाली आहे.सांगली, मिरज, कुपवाड या शहरी भागात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांनी या वसाहती भरल्या आहेत. अॅटोमोबाईल उद्योगांसाठी लागणाºया स्पेअर पार्टस्चे कारखाने, यंत्रमाग, फूड इंडस्ट्री, सिमेंट आर्टिकल्सचे कारखाने, अॅनिमल फूड अशाप्रकारचे उद्योग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चांगला रोजगार देत शहराच्या समृद्धीला बळ देण्याचे काम या औद्योगिक वसाहतींनी केले, मात्र आता मंदीच्या दाट अंध:कारात हे उद्योग चाचपडताना दिसत आहेत. येथील ६० टक्के उलाढाल ठप्प झाली असून ३० टक्के कारखान्यांनी उत्पादन बंद केले आहे. वस्त्रोद्योग आणि अॅटोमोबाईल कंपोनंट इंडस्ट्रीजला सर्वात मोठा दणका बसला आहे. कामगारांना आता महिन्यातील केवळ १५ दिवसच काम मिळत आहे. कामगारांचा पगार, अन्य खर्चाचा ताळमेळ पाहता, उत्पादित मालातून मिळणाºया नफ्यावर संक्रांत आली आहे. अनेक कारखाने तोट्यात गेल्याने त्यांना हा तोटा भरून काढण्याची चिंता सतावू लागली आहे.१६ हजार कामगारांवर सावट : सांगली, मिरज, कुपवाड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात सुमारे १६ हजार कामगार काम करतात. यातील ५ ते ६ हजार कामगार केवळ अॅटोमोबाईल कंपोनंट क्षेत्रातील आहेत. त्याखालोखाल वस्त्रोद्योगातील कामगारांची संख्या अधिक आहेत. त्यामुळे अॅटोमोबाईल क्षेत्रातील कामगारांना मोठा फटका बसला आहे. हजारो कामगारांना आता निम्म्या वेतनात आपला संसार चालवावा लागत आहे. जवळपास ५० टक्के कामगारांना या मंदीचा मोठा फटका बसला आहे.काय आहेत कारणे1अॅटोमोबाईल इंडस्ट्रीजवर आलेल्या मंदीचे येथीलक्षेत्रावर सावट2करप्रणालीमुळे उत्पादन खर्चाचा ताळमेळ बिघडला3उत्पादित मालालामागणी घटली4संलग्न मोठ्या उद्योगांच्या अडचणीमुळे छोटे उद्योग संकटात5शासकीय मदतीचाअभाव6उद्योगांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी नाही7अनुदान योजनेचालाभ नाही8ग्रामीण अर्थव्यवस्थाबिघडल्याचा परिणामऔद्योगिकक्षेत्राची अपेक्षा1कर कमीकरावेत2विजेचे वाढलेलेदर कमी करावेत3सांगलीत मोठ्या उद्योगांच्या निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत4अडचणीतील उद्योगांना शासकीय मदत मिळावी5उद्योगांसाठीच्या शासकीय योजनांची जलदगतीने अंमलबजावणी व्हावी
औद्योगिक क्षेत्रात मंदीचा धूर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:44 AM