शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
5
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
6
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
7
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
8
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
9
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
10
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
12
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
13
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
14
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
15
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
16
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
17
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
18
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
19
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
20
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

..तर महायुतीकडे मिळाली असती लाल दिव्याची गाडी - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 5:03 PM

आष्ट्यात बुथ कमिटीच्या बैठका

आष्टा : मी महायुतीकडे गेलो असतो तर मलाही लाल दिव्याची गाडी मिळाली असती. मात्र, मी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहिलो. महाराष्ट्रात शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना स्थान आहे. वाळवा तालुका क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. इतरांसारखे कोणाच्या वळचणीला जाण्यापेक्षा लढत राहायचे ठरवले आहे. वाळवा तालुक्यातील जनतेचा कौल लढणाऱ्याच्या पाठीशी राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, बाजारवाडी, चांदोली वसाहत, मिरज वेस, चव्हाणवाडी, अंबाबाई मंदिरानजीक, बसुगडे मळा, साठेनगर, खोतमळा, तासगाव रस्ता, रामनगर, तक्क्या, महात्मा गांधी हाउसिंग सोसायटी यासह विविध ठिकाणी आयोजित बुथ कमिटीच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.जयंत पाटील म्हणाले, लोकसभेला जनतेने महायुतीला साथ दिली. भाजप देशात ‘४०० पार’च्या घोषणा देत असताना त्यांना जनतेने २४० वरच ठेवले. त्यांना दोन पक्षांचा टेकू घ्यावा लागला. जनतेला फोडाफोडी करणारे महायुतीचे सरकार पसंत नाही. विधानसभेलाही जनताच अशा राजकारणाला आपल्या मतांद्वारे उत्तर देईल.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, राजारामबापू कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव, बबन थोटे, विराज शिंदे, माणिक शेळके, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, विजय मोरे, समीर गायकवाड, शिवाजी चोरमुले, अर्जुन माने, पी. एल. घस्ते, प्रकाश पवार, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले स्मिता सोलनकर, सोनल शिराळकर व प्रा. संजय मगदूम यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील