विटा : देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांचे मोठे योगदान आहे. सैनिकांनी एकत्रित येऊन आपले प्रश्न मांडावेत. सैनिक फेडरेशन सैनिकांच्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
विटा येथे खानापूर तालुका आजी-माजी सैनिक फेडरेशनतर्फे आयोजित सैनिक संमेलन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, फेडरेशनचे तालुकाध्यक्ष अशोक कुंभार, सभापती महावीर शिंदे, विभाग प्रमुख तुकाराम सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुका आजी-माजी सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षपदी कॅप्टन अशोक कुंभार यांची निवड करण्यात आली.
आ. अनिल बाबर यांनी सैनिक हा देशाचा आत्मा आहे. त्यामुळे त्यांचे कोणतेही प्रश्न असले तर ते प्राधान्याने सोडविले जातील. सैनिकांच्या पाठीशी कायम उभा राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी कॅप्टन रामहरी सावंत, आकाराम सावंत, महादेव आमणे, आनंदराव पाटील, अधिराज माने, सार्जेन्ट अधिकराव कदम यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते. अशोक कुंभार यांनी आभार मानले.
फोटो - १६०७२०२१-विटा-सैनिक मेळावा : विटा येथे सैनिक फेडरेशनच्या मेळाव्यात कॅप्टन अशोक कुंभार यांना तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र आ. अनिल बाबर व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याहस्ते देण्यात आले.