ओळ : सांगलीत राजाराम ऐवळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता गेजगे, दीपक हेगडे, महादेव कांबळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : होलार समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक घेऊन समाजाला न्याय देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
सांगलीत होलार समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांच्या निवासस्थानी चाकणकर यांची सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी होलार समाजाचा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. चाकणकर म्हणाल्या, होलार समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न साेडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू. यावेळी होलार समाज समन्वय समितीच्या वतीने चाकणकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये होलार समाजभूषण वि. दा. ऐवळे यांचे सांगलीत स्मारक उभारण्यात यावे, या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा,
चर्मकार महामंडळात होलार समाजाला प्रतिनिधी देण्यात यावे, होलार समाजाच्या चुकीच्या जातीच्या नोंदी दुरुस्ती करून मिळाव्यात, होलार समाज अभ्यास आयोग नेमण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी होलार समाज समन्वय समिती युवा आघाडीचे अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे. सांगली जिल्हाध्यक्ष आनंदराव ऐवळे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक हेगडे, महादेव कांबळे, दगडू ऐवळे, सिद्धेश्वर करडे उपस्थित होते.