लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पलूस-कडेगाव तालुक्यातील विकासकामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्नशील आहे. तरीही
तांत्रिक अडचणींमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करावीत, त्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशी सूचना सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी सांगलीत केली. दोन्ही तालुक्यातील कामांच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, पलूस व कडेगाव तालुक्यातील कामे मार्गी लावण्यासाठी नियोजन केले आहे. तरीही काही कामे तांत्रिक अडचणींमुळे थांबली आहेत. ती प्रशासनाने तातडीने पूर्ण करावीत.
कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणींबाबत, घरांच्या नुकसानभरपाईबाबत निर्णय घ्यावा.
शिरसिंग व झाडोली या दोन वसाहती पलूस नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्याबाबत शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
चौकट
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करा
डॉ. कदम म्हणाले, तासगाव-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गाचे तुपारी ते पाचवा मैल येथील रखडलेल्या कामामुळे
लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लोकांना प्रचंड त्रासही सहन करावा
लागत आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे.