यंदाच्या हंगामासाठी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे एफआरपी आणि साखरेला चांगला दर मिळाल्यास अधिक २०० रुपये असा तोडगा निघाला होता. याप्रमाणे सोनहिरा कारखान्याने १ नोव्हेंबरपासून १५ नोव्हेंबर या कालावधित गाळपास आलेल्या उसाची एफआरपी एकरकमी जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. ३ नोव्हेंबरला गळीत हंगाम सुरू झाल्यापासून केवळ महिनाभरातच २ लाख २ हजार ५२० टन गाळप केले व २ लाख ४ हजार ६६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नोव्हेंबरच्या
पहिल्या आठवड्यात काही मोजक्या कारखान्यांनी हंगाम सुरू केले. त्यामधील सर्वप्रथम सोनहिरा कातखान्याने एकरकमी एफआरपी दिली.
कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ५ हजार ५०० टन असल्यामुळे हंगाम वेगात सुरू
आहे. ऊस दरात कारखाना अग्रेसर आहे.
चौकट :
कायदा पाळला
एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी कारखान्यांना १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. सोनहिरा कारखान्याने कायदा पाळला आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली आहे. इतर कारखान्यांनीही एकरकमी एफआरपी द्यावी.
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
फोटो : सोनहीरा कारखान्याचा फोटो वापरावा