इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीनचे पीक अवकाळी पावसाने वाया गेले आहे. जे काही उरलेले सोयाबीन आहे, त्यावर आता व्यापाऱ्यांनी हात मारण्यास सुरुवात केली आहे. आर्द्रतेचे कारण पुढे करत इस्लामपूरसह तालुक्यातील कासेगाव, आष्टा येथील शेतकºयांच्या हातात व्यापारी क्विंटलला केवळ २५00 रुपये टेकवत आहेत.
शासनाने यावर्षी सोयाबीनसाठी ३७१0 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. परंतु अवकाळी पावसाचा फटका काढणीस आलेल्या सोयाबीनला बसला आहे. ते पूर्ण वाळले आहे. परंतु सरींमधून पाणी असल्याने ते काढता येत नाही. काही ठिकाणी ते तडकून शेतात पडू लागले आहे. जे काही हाती लागले, ते शेतकरी बाजारात विक्रीस आणत आहेत. पण आर्द्रतेच्या नावाखाली व्यापारी ३७१0 पैकी शेतकºयांच्या हातात २५00 ते २६00 रुपयेच टेकवत आहेत. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने दुर्लक्ष केले आहे.
बाजार समितीचे सचिव विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सोयाबीनच्या १0 आर्द्रतेला शासनाचा ३७१0 हमीभाव आहे. परंतु यावर्षी पावसात पूर्णपणे सोयाबीन भिजल्याने विक्रीस येणारे सोयाबीन हे २२ ते २४ आर्द्रतेचे येत आहे. आम्ही आॅगस्ट महिन्यामध्येच ‘नाफेड’ला विनंती अर्ज करून शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सोयाबीन खरेदी करणाºया व्यापाºयांच्या आर्द्रता तपासणी यंत्राची तपासणी बाजार समितीने केली आहे....अन्यथा आंदोलनव्यापारी संगनमताने शेतकºयांची फसवणूक करत आहेत. शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करुन शेतकºयांना न्याय द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.