इस्लामपूर : शहरातील उरुण आणि इस्लामपूर चावडीमध्ये नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांची निर्गती करून नोेंदी घालण्यासाठी शुक्रवार, दि. २६ फेब्रुवारी आणि १ व २ मार्च अशा तीन दिवशी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.
ज्या अर्जदारांचे फेरफार नोंदीसाठीचे अर्ज प्रलंबित असतील त्यांनी वरील तीन दिवशी उरुण आणि इस्लामपूर चावडी सज्जात उपस्थित राहून प्रलंबित नोंदी अर्जाची माहिती द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम तीन दिवस कार्यालयीन वेळेत ठेवण्यात आली आहे. अर्जदारांनी स्वयंशिस्त, सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील, असे सबनीस यांनी स्पष्ट केले आहे.