सांगली : जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही., एड्स प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरावरील जनजागृती प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथून काढण्यात आली. या एड्स जनजागृती फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीचे न्यायाधीश विश्वास माने, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, एआरटी सेंटरचे डॉ. ईश्वर शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. पाटणकर, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत आदि उपस्थित होते.जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती सांगली मार्फत एच.आय.व्ही. एड्स जनजागृती प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली येथून काढण्यात आली. ही प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथून प्रारंभ होऊन - एस. टी. स्टॅण्ड - महानगरपालिका झ्र राजवाडा चौक या मार्गे निघून स्टेशन चौक येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारक प्रांगण येथे या फेरीची सांगता झाली. यावेळी आधार प्रोजेक्टस वेल्फेअर सोसायटी सांगली यांच्यावतीने एड्स जनजागृतीवर आधारीत पथनाट्य सादर करण्यात आले व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांनी एड्स विरोधी शपथ घेतली.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून एड्स जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमास मौलीक सहकार्य केल्याबद्दल रोटरी क्लब, विविध स्वयंसेवी संस्था, १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ मधील शिक्षक, विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.या प्रभात फेरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, आम्हीच आमचे संस्था, देवदासी महिला विकास संस्था मिरज, श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय सांगली, श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल सांगली, दिलासा संस्था मिरज, श्रीमती सी. बी. शहा महिला महाविद्यालय सांगली, जि.ए. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगली, भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेज, महाराष्ट्र बटालियनचे एन.सी.सी. विद्यार्थी, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, राजमाता नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, गणपतराव आरवाडे कॉलेज, विहार काळजी आणि आधार केंद्र, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज यासह विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी झ्र विद्यार्थीनी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. या प्रभात फेरीमध्ये पत्रकार दीपक चव्हाण यांच्या एड्स जनजागृती चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले..