इस्लामपूर येथे वीज बिल समन्वय समितीच्यावतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहन पाटील, मकरंद करळे, शाकीर तांबोळी, उमेश कुरळपकर, बी. जी. पाटील, रवी सूर्यवंशी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील विविध संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या वाळवा तालुका बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. इस्लामपूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. महावितरणकडून दडपशाहीने सुरू असलेल्या वीजबिल वसुली आणि बेकायदेशीरपणे वीज कनेक्शन तोडले जात असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता.
लॉकडाऊन काळात चुकीची वीजबिले देण्यात आली होती. या वीज बिलामध्ये राज्य शासन सवलत देईल, या अपेक्षेने ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाहीत. मात्र महावितरणकडून दडपशाही मार्गाने नोटिसा देऊन वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू आहे. हे बेकायदेशीर काम न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वीज बिल समन्वय समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन महावितरणच्या कार्यकारी अभियत्यांना देण्यात आले आहे.
यावेळी शाकीर तांबोळी, बी. जी. पाटील, मोहन पाटील, मकरंद करळे, उमेश कुरळपकर, सुनीता देसाई, शांता कारजकर, रवी सूर्यवंशी, बबन गवळी, अमोल कांबळे, नौशाद तांबोळी, यासीम मणेर, झाकीर मुजावर, आमीर तांबोळी, शिवप्रसाद जंगम उपस्थित होते.