मिरज : ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व मिरज पंचायत समितीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्या पत्नी रूपाली कुंभार यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करून आदर्श निर्माण केला.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, सभापती गीतांजली कणसे, उपसभापती अनिल आमटवणे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, महेश कणसे शिक्षण विस्तार अधिकारी गणेश भांबुरे, सदाशिव मगदूम, सचिन चव्हाण, शिक्षक संघाचे मोहन माने यांची प्रमुख उपस्थिती हाेती. सभापती गीतांजली कणसे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामसेवक, शिक्षक व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला. शिबिर यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी सरगर यांचे विशेष सहकार्य मिळाले. शिबिरात ४० दात्यांनी रक्तदान केले.
चाैकट
यांनी केले रक्तदान...
रामराव पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल चव्हाण, विनायक मोरे, बसवराज कुमार, गणेश भांबुरे, संग्रामसिंह वाघमारे, रमेश मगदूम, चंद्रकांत कांबळे, सदानंद सवाईराम, शशिकांत कांबळे, रमाकांत निंबाळकर, ख्वाॅजासाहेब शेख, आलम फकीर, कौसेन. मुल्ला, विकास वायदंडे, नागेश कोरे, सुरेश कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, तात्यासाहेब नगरगच्ची, वसवराज देवरमुनी, संदीप साळुंखे, बजरंग कांबळे, संदीप आवळे, अजिंक्य माने, कृष्णात पाटोळे, प्रमोद शेंडगे, पांडुरंग रोकडे, कृष्णात पाटील, सचिन बरगाले, शशिकांत पाटील, अण्णासाहेब एडके, विनायक इंगळे, प्रसाद शहा.
चौकट
तहसीलदारांच्या सौंभाग्यवतींनी महिलांना केले प्रोत्साहित!
शिबिरात तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्या पत्नी रूपाली कुंभार यांनीही रक्तदान करून महिला कर्मचाऱ्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. कुंभार यांच्याबरोबर स्मिता शेळके, जयश्री कुंभार, रूपाली चोथा, विद्या देशमुख, अर्चना साळुंखे यांनी रक्तदाब करून सहभाग नोंदविला.
फोटो : १७ मिरज १
ओळ : मिरज पंचायत समितीमध्ये आयाेजित रक्तदान शिबिरात सभापती गीतांजली कणसे, उपसभापती अनिल आमटवणे, तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.