सांगली : शहर व परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली. ढगांची दाटी अद्याप कायम असून, गुरुवारी मोठा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ वाजता शहरातील काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही मोठ्या पावसाची चिन्हे असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. जिल्ह्याच्या काही भागात मोठा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या तापमानात येत्या सहा दिवसात वाढ होणार असून, कमाल तापमान ३४ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. किमान तापमान २३ ते २४ अंशाच्या घरात राहण्याची चिन्हे आहेत. बुधवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३१ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले.