आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वच महापालिका क्षेत्रांत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार कडक अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेसोबत महापालिका यंत्रणाही सज्ज आहे. रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी राहील. हॉटेल्ससह सर्वच रात्रीपर्यंत चालणारे व्यवसाय दहापर्यंत शटर डाऊन झालेच पाहिजेत. त्यांना तशा नोटिसाही बजावल्या जातील. हॉस्पिटल्स, रुग्ण, रुग्णवाहिका, औषध दुकानांसह ‘अत्यावश्यक सेवां’ना या कालावधीत सूट राहील.
याव्यतिरिक्त कोणालाही सूट असणार नाही. त्यादृष्टीने रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदीही राहील. या कालावधीत तीनही शहराच्या प्रवेशद्वारांसह अंतर्गत रस्ते, चौकात पोलीस, महापालिका यंत्रणेचा वॉच राहील. भाजीपाला तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसह अत्यावश्यक सेवांना पहाटेच्या दरम्यान या कालावधीत सूट राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
पोलीस यंत्रणा सज्ज : दीक्षित गेडाम
अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, कर्मचारी आणि होमगार्ड संचारबंदीच्या काळात बंदोबस्तासाठी तैनात असतील. मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात येणार असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. हॉटेल्स्, मॉल्स्ना निर्धारित वेळेत बंद करण्यात यावेत, अशी सूचनाही दिली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.