शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

‘श्रीराम’च्या साखर व्यवस्थापकाची सांगलीत आत्महत्या

By admin | Published: January 16, 2017 12:30 AM

‘श्रीराम’च्या साखर व्यवस्थापकाची सांगलीत आत्महत्या

सांगली : फलटण (जि. सातारा) येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे निर्मिती व्यवस्थापक व मुख्य लेखाधिकारी सुनील गजानन पुजारी (वय ४९, रा. चिनार को-आॅप. हौसिंग सोसायटी, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांनी सांगलीतील ‘तृप्ती’ लॉजमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी पुजारी यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. सुनील पुजारी १३ जानेवारीला रात्री साडेनऊ वाजता मुख्य बसस्थानकाजवळील ‘तृप्ती’ लॉजमध्ये उतरले होते. त्यांना लॉजमधील नऊ क्रमांकाची खोली मिळाली होती. १४ जानेवारीला सकाळी नऊ वाजता स्वच्छता कर्मचारी त्यांच्या खोलीची स्वच्छता करण्यासाठी गेला होता. कर्मचाऱ्याने खोलीचा दरवाजा ठोठावला; पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पुजारी कदाचित झोपले असतील, असा अंदाज बांधून कर्मचारी निघून गेला. दुपारी चार वाजता तोच कर्मचारी पुन्हा खोलीच्या स्वच्छतेसाठी गेला. तेव्हाही पुजारी यांनी दरवाजा उघडला नाही. कर्मचाऱ्याने हा प्रकार लॉजचे व्यवस्थापक संतोष केरेकर यांना सांगितला. केरेकर सायंकाळी साडेपाच वाजता खोलीकडे गेले. त्यांनीही पुजारी यांना हाक मारली. अर्धा तास ते पुजारी यांना उठविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पुजारी यांचा आतून आवाजही आला नाही. शेवटी शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. खोलीचा दरवाजा मोडण्यात आला. त्यावेळी पुजारी खाटावरून खाली मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. त्यांच्या जवळच विषारी औषध होते. पुजारी यांनी लॉजच्या रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव बरोबर लिहिले होते; पण पत्ता रामनगर, ब्राह्मण गल्ली, फलटण असा लिहिला आहे. त्यांच्याजवळील कागदपत्रांत वाहन परवाना सापडला. यावरून ते इचलकरंजीचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. आत्महत्या करण्यापूर्वी पुजारी यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलिसांनी ही खोली सध्या सील केली आहे. लॉजमधील ग्राहकांच्या नोंदीचे रेकॉर्डही ताब्यात घेतले आहे. लॉजचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांकडे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीतून पुजारी एकटेच लॉजमध्ये उतरले होते. १३ जानेवारीला खोलीत गेल्यानंतर ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)‘चिठ्ठी’तील मजकूर : पोलिसांची गोपनीयतापुजारी यांनी चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराबाबत शहर पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. चिठ्ठीत त्यांनी काय लिहिले आहे, याबाबत विचारणा केली; पण पोलिसांनी अत्यंत गोपनीय आहे. ते सांगता येणार नाही, असे सांगितले. पुजारी यांनी सांगलीत लॉजमध्ये जाऊन आत्महत्या केल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येविषयी गूढ निर्माण झाले आहे. त्यांचे नातेवाईक चिठ्ठीतील मजकुराची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे समजते. सांगलीत स्थायिक पुजारी वाणिज्य शाखेचे पदवीधर होते. हुपरी (जि. कोल्हापूर) येथील जवाहर साखर कारखान्याकडे लेखाधिकारी म्हणून सेवेत होते. जवाहर साखर कारखान्याने फलटण येथील श्रीराम साखर कारखाना चालविण्यास घेतला आहे. या कारखान्याकडे पुजारी यांची निर्मिती व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली होती. मुलांच्या शिक्षणासाठी ते आपल्या कुटुंबासह सांगलीतील विश्रामबाग येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई-वडील, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे.