शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

Sangli: व्हिडिओ व्हायरल करीत एसटी वाहकाने पलूसमध्ये संपवले जीवन, तीन अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:40 PM

मूळचा पुणे जिल्ह्यातील, तपासणी अधिकाऱ्यांनी चुकीची कारवाई केल्याचा आरोप

पलूस : पलूस एसटी आगारातील वाहक दुशांत गंगाराम बुळे (वय ३४, रा.थांबूळ गवान, ता.जुन्नर, जि.पुणे. सध्या रा.कोयना वसाहत, पलूस) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. तिकीट तपासणी अधिकाऱ्याच्या खोट्या कारवाईमुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी व चित्रफीत त्यांनी आत्महत्येपूर्वी तयार करुन ती व्हायरल केली आहे.

दरम्यान, याची गंभीर दखल घेत, तिघा अधिकाऱ्यांना प्रशासनाने तातडीने निलंबित केले आहे. सहायक वाहतूक निरीक्षक जयदेव भास्कर सांतुरकर, वाहतूक नियंत्रक हणमंत रामचंद्र खरमाटे आणि तपासणी पथकातील चालक मोहन विजय कल्याणकर अशी निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.बुळे यांच्या आरोपांची चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाली आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. या संदर्भात त्यांचा भाऊ जालिंदर बुळे यांनी पलूस पोलिसांत फिर्याद दिली. दुशांत हे शनिवारी सकाळी साडेआठ वाजता कराड ते जत बसमध्ये ड्युटीवर होते. ही बस तासगाव स्थानकात आली असता, तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी तपासणी केली, तेव्हा एका प्रवासी महिलेकडे अमृत योजनेचे चुकीचे तिकीट आढळले.

बुळे यांनी महिलेला अर्धे तिकीट व अन्य एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला अमृत योजनेचे तिकीट दिले होते. त्या दोहोंनी तिकिटांची अदलाबदल केली होती. संबंधित ज्येष्ठ नागरिक अगोदरच्या थांब्यावर उतरून गेला. महिला प्रवाशाचे तिकीट त्याच्यासोबतच होते. तपासनीसांनी तिकिटे तपासली, तेव्हा महिलेकडे अमृत योजनेचे तिकीट आढळले. त्यामुळे पथकाने कारवाईचा निर्णय घेतला.बुळे यांनी मशिन तपासून कारवाई करा, अशी विनंती पथकाला केली. मात्र, तपासणी अधिकाऱ्यांनी खोट्या प्रवाशाचे नाव टाकून कारवाई केल्याची तक्रार बुळे यांनी केली. निराश झालेल्या बुळे यांनी घरी गेल्यानंतर सायंकाळी चित्रफीत बनवली. कारवाईचा जाब विचारत एक चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर व्हायरल केली. खोटी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडू नका, असे त्यांनी चित्रफितीत म्हटले आहे. त्यानंतर, दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी तपासणीच्या कार्यवाहीचे चित्रीकरण मोबाइलवर केले व स्टेटसला ठेवले होते. पोलिसांना पंचनाम्याच्या वेळी चिठ्ठीही सापडली.

बुळे यांच्या कुटुंबावर संकटगेल्याच वर्षी बुळे यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. या दाम्पत्याला सात आणि दोन वर्षे वयाच्या दोन लहान मुली आहेत. आई-वडिलांच्या निधनाने त्यांच्यावरील छत्रछाया हरपली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणे