शिराळा : शिराळा येथे मोरणा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचा डांबरीकरण कामाचा प्रारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. नगराध्यक्षा सुनीता निकम यांची प्रमुख उपस्थितीत होत्या.
आमदार नाईक म्हणाले, एक किलोमीटरला सुमारे २२ लाख रुपये खर्च येणार आहे. सुमारे वीस वर्षानंतर प्रथमच हा रस्ता होत आहे. उर्वरित रस्त्याच्या कामासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून निधी देऊन पूर्ण करणार आहे. तोरणा भुईकोट किल्ला विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. तो राज्य सरकारकडून मंजूर करून घेऊन कामे लवकरात लवकर सुरू होतील, यासाठी प्रयत्नशील आहे.
यावेळी विजयराव नलवडे, विश्वास कदम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, सभापती प्रतिभा पवार, सुजाता इंगवले, मोहन जिरंगे, सुनंदा सोनटक्के, गौतम पोटे, कीर्तीकुमार पाटील, संजय हिरवडेकर, सुनील कवठेकर मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील उपस्थित होते. उदय गायकवाड यांनी आभार मानले.