ओळ : मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. यासाठी उद्योजक भालचंद्र पाटील यांनी पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. साेमवारी १५० लोकांचे लसीकरण करण्यात आले. माजी निवृत्त पोलीस अधिकारी तानाजी जाधव यांना लस देऊन माेहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच सुरेखा सपकाळ, युवक नेते राजाभाऊ बिरनाळे, माजी उपसरपंच महावीर हौजे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद लांडे, दिलावर शिकलगार, माजी उपसरपंच प्रवीण कोळी, रमेश श्रीरंबेकर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी आंबोळे उपस्थित होते. यासाठी डाॅ. चेतन सूर्यवंशी, डाॅ. अस्मिता पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.