सांगली : भीमा-कोरेगावला मानवंदना देण्यापासून मज्जाव केल्याप्रकरणी ऑल इंडिया दलित पँथर सेनेच्यावतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
याबाबत दिलेल्या पत्रकात सेनेने म्हटले आहे की, १ जानेवारी १८१८ रोजी महार सैनिकांनी एक नवा इतिहास घडविला. या लढाईत शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना व या सैनिकांच्या शौर्याची आठवण रहावी म्हणून त्यावेळी असणाऱ्या ब्रिटिश सरकारने विजय स्तंभ उभा केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी न चुकता या विजय स्तंभास मानवंदना देण्यास येत असत. राज्यातील व देशातील विविध कानाकोपऱ्यामधून लाखो-करोडो अनुयायी ऐतिहासिक विजयस्तंभ येथे मानवंदना देण्यास १ जानेवारी रोजी येत असतात. पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवेळी पायाला भिंगरी बांधून विविध ठिकाणी महाआघाडी सरकार व भाजप नेत्यांनी गावोगावी सभा घेतल्या. त्यावेळी कोविडचे नियम लागू नव्हते का. केवळ भीमा-कोरेगाव येथे मानवंदना कार्यक्रमावेळीच राज्य सरकारने मज्जाव केला आहे, असा सवाल त्यांनी केला. याचा निषेध ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम, तौसीफ मुल्ला, आकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अमित वेटम, प्रकाश कांबळे, गणेश एटम आदींनी केला.