सांगली : चॉकबॉल खेळास स्कूल गेम फेडरेशन आॅफ इंडियाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेत या खेळाचा समावेश झाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून चॉकबॉल हा खेळ शासन मान्यतेच्या प्रतिक्षेत होता. हॅण्डबॉल आणि बास्केटबॉल यांच्या मिश्रणातून हा खेळ तयार झाला आहे. १९७१ मध्ये स्वित्झलँडमध्ये या खेळाचा जन्म झाला. १४२ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. तैवान हा देश सध्या आघाडीवर आहे. या खेळाचे मैदान २६ मीटर लांब व १५ मीटर रूंद असते. स्पर्धेसाठी दोन नेट (फ्रेम) व एक बॉल इतकेच साहित्य लागते. एकूण बारा खेळाडू असतात त्यापैकी पाच राखीव असतात. एक सामना ४५ मिनीटांचा असतो. सांगली जिल्हा चॉकबॉल असोसिएशनने आजवर सांगलीत चार राज्यस्तरीय व एक राष्ट्रीय चॉकबॉल स्पर्धा आयोजित करून त्या यशस्वी केल्या. या खेळाच्या प्रचार-प्रसारामध्ये जिल्हा प्रारंभीपासून आघाडीवर आहे. यंदाच्या वर्षीच्या राज्यस्तरीय स्पर्धा सांगलीत होणार असून राष्ट्रीय स्पर्धा गोवा येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चॉकबॉल असोसिएशनचे सहसचिव प्रताप पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धा सांगलीत होणार
By admin | Published: July 21, 2014 11:46 PM