शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

भाजप प्रदेशाध्यक्ष येत्या गुरुवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर, गटबाजीमुळे बावनकुळेंचीच कसोटी

By शीतल पाटील | Published: October 03, 2023 5:33 PM

पक्षातर्गंत वादावर तोडगा निघणार?

सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेसाठी सांगलीची खेळपट्टी तयार करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार ५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. भाजपमध्ये लोकसभा उमेदवारीवरून पक्षातंर्गंत गटबाजी उफाळून आली आहे. त्यावर बावनकुळे तोडगा काढणार का, याचीच उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.लोकसभा निवडणुकीसाठी सात ते आठ महिन्याचा कालावधी असला तरी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपने जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यपातळीवर नेत्यांचे दौरे आखले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गुरुवारी सांगली दौऱ्यावर येत आहेत. गेल्या काही महिन्यापासून भाजपमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून इच्छुकांची संख्या वाढली आहे. विद्यमान खासदार संजय पाटील यांना पक्षातून आव्हान दिले जात आहेत.पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही तयारी चालविली आहे. दोन्ही पाटलांमध्ये पूर्वीपासूनच राजकीय वाद आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ते उफाळून आले आहेत. संजय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषणावर टीका केली तर देशमुख यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आपली दिशा स्पष्ट केली. भविष्यात तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात देशमुख यांना आर. आर. पाटील गटाच्या मदत अपेक्षित आहे.भाजपमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्यात त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ, जत, खानापूर-आटपाडी या विधानसभा मतदारसंघावर अधिक लक्ष दिले. तेथील संघटनात्मक बांधणीचा ते आढावा घेणार आहेत. याशिवाय भाजप कोअर कमिटीची बैठकही होणार आहे. या बैठकीत भाजपमधील वाद मिटतील की आणखी चव्हाट्यावर येतील, याचीच उत्सुकता आहे.

तासगाव, मिरजेत आढावा बैठकसंजय पाटील यांच्या होमपीच असलेल्या तासगावातील आढावा बैठकीत पलूस कडेगावच्या कार्यकर्त्यांचा समावेश नाही. तर मिरजेतील बैठकीत देशमुख यांच्या होमग्राऊंडचा समावेश आहे. दोन्ही नेत्यांच्या तालुक्यातील कार्यकर्ते एकाच बैठकीला उपस्थित राहून गोंधळ उडणार नाही, याची दक्षता भाजपने घेतली असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे