राजारामनगर येथे बापूंच्या पुतळ्यास महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अभिवादन केले. यावेळी दिलीपराव पाटील, पी. आर. पाटील, विनायक पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय बजाज, राहुल पवार, शहाजी पाटील, संग्राम पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सांगली, मिरज व कुपवाड शहरांच्या विकासाचे व्हिजन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पुतळा सांगली शहरात उभा करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
सूर्यवंशी यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी त्यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार केला.
दिलीपराव पाटील म्हणाले, महापौर-उपमहापौर निवडीकडे केवळ सांगली जिल्हा नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. आपल्या निवडीने जयंत पाटील यांच्या नावलौकिकात मोठी भर पडून राज्याच्या राजकारणास नवी दिशा मिळणार आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने एकसंधपणे काम केल्यास निश्चितपणे यश मिळते, हा संदेश राज्यात गेला आहे. जयंत पाटील निधी कमी पडू देणार नाहीत.
यावेळी संजय बजाज, पै. राहुल पवार, नगरसेवक शेडजी मोहिते, मनगू सरगर, मुस्ताक रंगरेज, सचिन जगदाळे, आयुब बारगीर, धनंजय पाटील, युसूफ जमादार, आझम काझी, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव उपस्थित होते.