सांगली : वेळेत निदान, वेळेत उपचार, विलगीकरणातील पथ्यपालन या जोरावर कर्नाळ (ता. मिरज) येथील कांबळे कुटुंबाने घरी राहूनच कोरोनावर यशस्वी मात केली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत कोरोनावर सोप्या पद्धतीने मात करता येऊ शकते, हा आरोग्यमंत्र त्यांनी समाजाला दिला.
कर्नाळमध्ये ग्रामीण भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक सुभाष राजाराम कांबळे यांच्या घरात त्यांच्या पत्नी सिंधुताई, मुलगा प्रदीप, सून प्रतिभा, तसेच कौस्तुभ व सौरभ ही नातवंडे या सर्वांना कोरोनाने गाठले होते. एकाचवेळी या एकत्र कुटुंबातील २७ जण बाधित झाले. तरीही या आजाराने न खचता संपूर्ण कुटुंबाने खंबीरपणे मुकाबला करीत, डॉक्टर व प्रशासनाच्या नियमांचे व सूचनांचे पालन करीत यावर यशस्वीपणे मात केली.
कोट
आम्हाला कोरोना झाल्याचे कळाल्यानंतर डॉ. आर. एस. पाटील, डॉ. विजय पवार, डॉ. शैलजा पवार, तसेच अंगणवाडी मदतनीस सजाताई खांडेकर यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्ही यातून सहज बाहेर पडलो.
- प्रदीप कांबळे, कोरानामुक्त
कोट
योग्यवेळी निदान, योग्य उपचार व नियमांचे काटेकोर पालन आम्ही केल्यामुळे कुटुंबीय त्यातून बाहेर पडले. सकस आहारही घेतला.
- सुभाष कांबळे, कोरोनामुक्त
कोट
आम्ही बाधित असतानाही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला. मनावर आमच्या कोणताही ताण आला नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केले. त्याचा फायदा झाला.
- प्रतिभा प्रदीप कांबळे, कोरानामुक्त
कोट
इतक्या लोकांना काेरोना झाला, पण आम्ही घरीच राहून त्यावर मात केली. कोणालाही कसलीही भीती वाटली नाही. औषधोपचार वेळेत घेतले. त्यामुळे आम्ही बरे झालो
- सिंधुताई सुभाष कांबळे