शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

पोलीस असल्याचा बहाणा करून दागिने लंपास, विटा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 12:37 PM

शेळ्या चरण्यासाठी शेतात गेले असता तीन अनोळखी व्यक्तींनी लुटले

विटा : शेतात शेळ्या चारण्यास गेलेल्या शांताराम रामचंद्र भोसले (वय ५७) या सेंट्रिंग कामगाराचे ४२ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलीस असल्याचा बहाणा करून तिघा भामट्यांनी लंपास केले. ही घटना साेमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता विटा येथील कुंडल रस्त्यावर घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.विटा येथील शांताराम भोसले हे सेंट्रिंग व्यवसाय करतात. दि १९ सप्टेंबर रोजी ते शेळ्या चरण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्याजवळ तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यापैकी दोघांनी ‘आम्ही पोलीस आहोत, तुम्ही एवढे सोने घालून कशाला फिरता’, असे म्हणत ‘तुमच्याकडे असलेले सर्व सोने आमच्याकडे द्या’, असे सांगितले. एकाने भोसले यांना पांढरा कागद देऊन त्या कागदावर सोने ठेवण्यास सांगितले.यावर भोसले यांनी त्यांच्या हातातील साडेआठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व साडेआठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी असे सुमारे ४२ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना काढून दिले. हे दागिने हातात आल्यानंतर तिघा ठकसेनाने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत शांताराम भोसले यांनी शनिवारी, दि. २४ रोजी विटा पोलिसांत फिर्याद दिली. निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी