याप्रकरणी एस. टी. कामगार सेनेची बैठक झाली. यावेळी बजरंग पाटील बोलत होते. ते म्हणाले की, परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांना एका गंभीर प्रकरणात निलंबित केले आहे. त्यानंतर त्यांनी खात्यातील बदल्या आणि पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीबाबत मत मांडले असून, आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. याच तक्रारीत नाशिक विभागाचे परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्याविरुद्धही आरोप आहेत.
कळसकर यांनीही संबंधित आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. या प्रकरणाची पुढेही चौकशी होईलच. मात्र, तक्रारदाराने आरोप करताना पुरावे दिलेले नाहीत. तसे त्यांनी तक्रारदाराला आव्हानही दिलेले आहे. या प्रकरणात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना हेतुपुरस्सर बदनाम करण्याचे षङ्यंत्र भाजप नेत्यांनी रचले आहे. विरोधकांची केवळ विरोधासाठी चिखलफेक सुरू आहे. यापुढे ही चिखलफेक न थांबल्यास एस.टी. कामगार सेना आणि शिवसेना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी एस. टी. कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश हंकारे, सरचिटणीस विलासराव यादव, जिल्हा उपप्रमुख शंभोराज काटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.