शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

‘एफआरपी’साठी रास्ता रोको

By admin | Published: January 16, 2015 11:29 PM

पलूसमध्ये आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

पलूस : ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज, शुक्रवारी पलूसच्या मध्यवर्ती चौकात दोन तास रास्ता रोको करण्यात आला.संघटनेचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा व पलूस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पोपट मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी राजोबा म्हणाले की, चालू हंगामात उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याने हे आंदोलन सुरू आहे. चालू हंगामात कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न देता प्रती टन १ हजार ९०० रुपये दर जाहीर केला आहे. त्या दराप्रमाणेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी-प्रमाणे दर द्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहोत.पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने ऊस पीक घेतले आहे. परंतु साखरसम्राटांनी शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर न देता प्रतिटन १ हजार ९०० रुपये देण्याची घोषणा करीत त्याप्रमाणे रक्कम देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. एफआरपीप्रमाणे दर न दिल्यास आता जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना कार्यक्षेत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभे करणार असल्याचे संदीप राजोबा म्हणाले. पलूस तालुका अध्यक्ष महावीर पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष राजू माने, महावीर पाटील, पोपट मोरे, अधिक जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)आंदोलन आणि परीक्षारास्ता रोकोमुळे एसटी थांबली होती. त्यामध्ये एक महाविद्यालयीन विद्यार्थी सांगलीला परीक्षेसाठी जाणार होता. त्याने अनेकवेळा एसटी सोडा, माझी परीक्षा आहे, अशी विनंती केली. अखेर संदीप राजोबा यांनी त्याला पैसे देऊन परीक्षेसाठी दुसऱ्या गाडीने पाठविले.