स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव द्या, उसाची एफआरपी १४ दिवसांत द्या, शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज द्या, मगच वीज कनेक्शन तोडा, शेतकऱ्यांकडून तीन एचपीचे बिल पाच, पाचचे बिल सात एचपी वाढ करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वाढीव बिले वसूल करण्यात आलेली आहेत, ती तात्काळ परत करा, मगच वीज कनेक्शन तोडा, घरगुती वीज बिल माफीचे आश्वासन पाळा व वीज कनेक्शन तोडा, शेतीपंपासाठी ज्यांनी पैसे भरले आहेत त्यांना तात्काळ वीज पुरवठा करा, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम जाधव, दामाजी डुबल, सचिन पाटील, सुरेश पाचंबरे, शशिकांत माने, संदेश पाटील, अदील मुजावर, रितेश मारुती तोडकर, प्रकाश कदम, तानाजी पाटील, सुरेश पाटील, धोंडीराम देवरणे, ज्योतीराम कदम, संदीप खटावकर, शिवाजी पाटील, प्रवीण कदम, सुभाष पाटील, अप्पासाहेब शिरोटे, नरेंद्र शिरोटे आदी उपस्थित होते.