सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर व आरोग्य विभागातील कर्मचाºयासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ रविवारी अधिकारी, कर्मचाºयांनी संताप व्यक्त करीत काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे दिवसभरात शहरातील कचरा उठाव ठप्प झाला होता. शनिवारच्या आठवडा बाजारातील कचरा रस्त्यावर पडल्याने मुख्य बाजारपेठेत दुर्गंधी पसरली होती. दरम्यान, सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर कर्मचाºयांवतीने निदर्शने केली जाणार आहेत.शहरातील संजयनगर येथील अमोल कोळेकर या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करीत आयुक्त खेबडूकर व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकला. हा प्रकार लक्षात येताच शनिवारी रात्री महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व १५० हून अधिक कर्मचारी शहर पोलीस ठाण्यासमोर जमले होते. त्यांनी पटेल यांच्याविरोधात तक्रार देण्याचाही प्रयत्न केला; पण पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.या प्रकारानंतर रविवारी सकाळी पुन्हा महापालिका मुख्यालयासमोर सर्व कर्मचारी एकत्र आले. पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. तीन दिवसांपूर्वी कदम नावाच्या एका व्यक्तीकडून त्रास होत असल्याबद्दल लेखी तक्रार घेऊन गेलेल्या कर्मचाºयांचीही पोलिसांनी दखल घेतली नाही. दिवसभर थांबवूनही तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यानंतर उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचाºयांची बैठक झाली. यावेळी (तंत्र मॅनेजर) सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी महापालिकेच्या कर्मचाºयांना काहीजणांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आयुक्त आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्याबद्दल तसेच सफाई कर्मचाºयांबद्दल टाकलेला मजकूर आक्षेपार्ह असून, संबंधितावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी कामगार संघटनेचे चिंतामणी कांबळे, विजय तांबडे यांनी कर्मचाºयांच्यावतीने याप्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या.जोवर संशयितावर कारवाई होत नाही, तोवर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगरसेवक सुब्राव मद्रासी, नितीन शिंदे, चिंतामणी कांबळे, काका हलवाई, धनंजय हर्षद, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, डॉ. सुनील आंबोळे, डॉ. संजय कवठेकर, चंद्रकांत आडके यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; आक्षेपार्ह मजकुराबद्दल संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:54 PM