शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बंडोबांच्या गळाची कहाणी

By admin | Published: October 02, 2014 9:43 PM

सांगली--सरकारनामा

बंडोबांनी दसऱ्याच्या तोंडावर दवंडी देऊन गावभर गलबला केल्यानं तमाम साहेब, भाऊ, काका, आबा, अण्णा, दादांची ‘सटकली’ होती. ही सटकलेली मंडळी मागं लागणार असल्यानं (आणि सोनं घेऊन मागं लागावीत यासाठीही!) समस्त बंडोबा सावध होते. काहीजण गळ टाकून बसले होते, तर काहीजण मुद्दाम मोबाईल समोरच ठेवून बसले होते. (हो! कधी नव्हे ते ‘तिकडून’ फोन यायचा आणि आपल्याला नेहमीसारखं उचलायचंं न कळल्यानं दारी आलेली लक्ष्मी परत जायची!)राजोबांच्या संदीपनं ब्रह्मनाळला कृष्णा-येरळेच्या संगमावर गळ टाकला होता. नंतर वाट बघून-बघून कंटाळल्यानं दाढीत बोटं खुपसून येरळेच्या वाळूत (पाण्यात नव्हे) बसला. बाबा-काकांच्या गाडीची, राजूभार्इंच्या निरोपाची प्रतीक्षा होती. होतंय का नाही, या विवंचनेत ‘गॅस’वर होता बिचारा! पण शेवटपर्यंत कुणीच आलं नाही. कुणी म्हणतंय ‘त्यानं गळ टाकून दिला’... कुणी म्हणतंय ‘वाळूवाल्यांच्या गाड्या काल तिथं फिरत होत्या’... तर कुणी म्हणतंय ‘चारचाकीवर त्याची बोळवण करण्यात आलीय, तरीही ऐकंना म्हटल्यावर राजूभार्इंनी नाद सोडून दिलाय.’जतच्या तलावाचं पाणी उथळ असल्यानं तिथं खळखळाटच फार. पण त्यातही शिंदे सावकारांचे सुरेशराव, जमदाडे साहेब, कुंभारीच्या जाधवांचे प्रभाकरपंत यांनी गळ टाकून ठेवला होता. जाधवांनी तर आतापर्यंत केलेल्या खर्चाची हातभर यादीच खिशात ठेवली होती. शिवाय त्यांची दवंडी गावभर सुरु होती. पाहुण्यांमुळं जतचा तिढा वाढणार, पण तो सुटणारही, याची पक्की खात्री कदम साहेबांना होती. त्यांनी विश्वजितला पाठवलं. तलावावर शिंदे कंपनीला गटवण्यात आलं. (साहेबांची गाडी दिसल्यावर डफळापूरचे चव्हाण, मीनाक्षीताई, आवंढीचे कोडग आधीच तिथून सटकले होते. त्यांनी गळ काढून घेतले होते.) दुसऱ्या बाजूला जमदाडे, जाधवांनी टाकलेला गळ बरोबर लागला आणि जगतापसाहेबांचा मासा घावला! या मंडळींना मागच्या वेळी शेंडग्यांचा मोठा मासा घावला होता. त्यानंतर मुंबईच्या गोदीतनं खाद्य आलं आणि तेरा जणांनी याच तलावात स्वत:च्या ‘हाता’नं ‘कमळ’ फुलवलं.संजयकाकांची ‘फोक्स वॅगन’ सांगलीच्या दिशेनं निघाली होती. रस्त्यात माधवनगर कॉटन मिलच्या मोकळ्या जागेत त्यांनी पप्पूशेठला गाठलं. पवारांचे दाढीवाले हणमंतरावही आले होते. काकांनी रस्त्याकडं बोट दाखवलं. गाडगीळ सराफांची गाडी चमचमत होती. पप्पूशेठ, हणमंतराव तिकडं धावले... धनपालतात्या हळूच गाडीतून बाहेर पडून चोरपावलांनी कुपवाडकडं पळताना दिसले म्हणे! मिरजेत डावरे साहेबांनी ‘हाता’वर पाणी सोडून (बाटलीबंद पाणी हं!) ‘चांगभलंऽऽ’ म्हणण्यासाठी गुलाल घेतला होता, पण साहेबांनी (कडेगावच्या की इस्लामपूरच्या?) दम भरताच त्यांनी गुलालही टाकून दिला. इस्लामपुरात अपेक्षेनुसार हिंदकेसरींच्या भीमरावनं गळ काढून घेतला. कुणी म्हणतंय, प्रतीकदादा-राजूभार्इंनी रावतेंना गप्प केलं, तर कुणी म्हणतंय, खुद्द इस्लामपूरच्या साहेबांनीच भीमरावला ‘मातोश्री’वर पाठवलं होतं आणि आता त्यांनीच वारणाकाठी गडबड नको, म्हणून त्याला थंड केलंय. महाडिक कंपनीनं आधीच हे ओळखलं होतं. त्यांनी मात्र हुशारीनं जिकडं पाणी जास्त खोल, तिकडं जायचा निर्णय घेतला.सांगलीत दिगंबर आणि मुन्नाकडं कुणी बघितलंच नाही. साहेबांना वाटलं, मदनभाऊ बघतील आणि मदनभाऊंना वाटलं, प्रतीकदादा बघतील. पण कुणीच बघितलं नसल्यानं दोघं बसून आहेत... पाणी वाढल्यावर शिंगट्या, वाम, मरळ मासे गळाला लागतील म्हणून..!जाता-जाता : दिनकरतात्यांनी आधी कमळाच्या तलावात आणि नंतर बारामतीच्या डोहात गळ टाकला होता. पण साहेबांनी त्यांना ‘अदखलपात्र’ ठरवलं होतं, तर संजयकाकांचं कमळ फुलवण्यात त्यांचा वाटा असल्यानं आबा चिडून होते. त्यामुळं गळाला काही लागलं नाही. अखेर बारामतीच्या डोहातलं पाणी आपल्या नाका-तोंडात जात असल्यानं डोहातून बाहेर पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते आता कमळाच्या तलावाकडंच जातील. (‘हे माहीतच होतं, दरवेळेलाच असं-कसं होतं? सगळं आधीच ठरलेलं असतं...’ अशी चर्चा ‘विष्णुअण्णा भवन’वर होती!) कुणी म्हणतंय, बारामतीच्या डोहात काही गळाला लागलं नाही म्हणून दिनकरतात्या कमळाच्या तलावाकडं चाललेत... कुणी म्हणतंय, साहेबांनीच तिकडचं सोनं (दसऱ्याला लुटायचं सोनं हं!) आणायला सांगितलंय... ताजा कलम : खंडेनवमीला म्हणे गाडगीळ सराफांची चमचमणारी गाडी सांगलीवाडीतून हळूच बाहेर पडली आणि दिनकरतात्यांनी शमीच्या झाडावरची (गंजलेली) शस्त्रं बाहेर काढली... असं सांगलीवाडीचा हरिदास सांगत होता. त्याला ‘वॉच’ ठेवायला साहेबांनीच बजावलं होतं.- श्रीनिवास नागे