लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापाैर, उपमहापौर निवडीच्या माध्यमातून काँग्रेसने सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. यापुढे काँग्रेस आणखी मजबूत करा, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपदाची संधी मिळाली. त्यानिमित्ताने सतेज ऊर्फ बंटी पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांची युवा नेते विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कसबा बावडा येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमहापौर उमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सांगली महापालिकेला भरीव निधी देऊन सांगलीचा विकास करू, असे अश्वासन सतेज पाटील यांनी दिले. यावेळी नगरसेविका वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, आरती वळीवडे, नगरसेवक मंगेश चव्हाण, अय्याज नायकवडी, रवींद्र वळीवडे, अल्ताफ पेंढारी, संपत भगत, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.